नमस्कार,

मराठी भाषिक मंडळ एडमंटन ला २०१७ साली जळजळ ३२ वर्ष पूर्ण झाली. या ३२ वर्षात मंडळाने बरीच मोठी वाटचाल केली.. एकत्र येण्यासाठी , ओळखी करून घेण्यासाठी मंडळ हे एकच माध्यम आहे. नाविन्य पूर्ण मनोरंजक कार्यक्रम ठेवणं , स्वादिष्ट आणि रुचकर जेवण देणं , प्रसन्न वातावरणात आखीव रेखीव कार्यक्रम सादर करणं हे ध्येय ठेऊन संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांची आखणी करणार आहोत.

तेव्हा मंडळी , आम्ही उत्तमोत्तम आणि चाकोरी बाहेरील कार्यक्रम आपल्यापुढे सादर करणार आहोत. आहे त्यापेक्षा मंडळाचा दर्जा उंचावण्यासाठी, सर्व क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही परिश्रम करणार आहोत. सर्व वयोगटातील, किंवा जुन्या आणि नविन सर्व सभासदांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू. होतकरू आणि मात्तबर, स्थानिक व भारतातील ,व्यावसायिक वा नवोदित कलाकरांना वाव मिळेल याची दक्षता घेऊ. आमच्या आणि पर्यायानी तुमच्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे.

मात्रं,

हे सर्व तुमच्या साथीनेच घडू शकेल. या साठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सहभागाची आणि सहकार्याची नितांत गरज आहे. तुमच्या कौतुकाची आणि सुचनांची आवश्यकता आहे. आपण एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही आपली व आपल्या मागच्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी , खास म्हणजे परदेशात राहणाऱ्या समाजासाठी फार महत्वाची गोष्ट आहे.


Announcements

  • गणेशोत्सव(Ganeshotsav) 2017 -

    Check our facebook page 


  • दीपावली-2016
    Posted Nov 9, 2016, 11:47 AM by Viraj Patil
  • गणेशोत्सव(Ganeshotsav) गणेशोत्सव-2015 कार्यक्रमाच्या काही अनमोल क्षणांना उजाळा देण्यासाठी कृपया इथे भेट द्या (आणखी काही फोटो किंवा व्हीडीओ लवकर सामील केले जातील)https://www.dropbox.com/sh/1hbtmjq4luo4fyt/AAB-mW6IGDfYPyiZvn4GpFWra?dl=0         
    Posted Sep 24, 2015, 12:42 PM by Viraj Patil
Showing posts 1 - 2 of 2. View more »


Ganesh Visarjan 2017

Ganesh_Visarjan_2017
You must be logged in to add gadgets that are only visible to you